निलेश लोढा असोसिएटस् च्या वतीने सत्कार संपन्न
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : दि . १९ / राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हनुमंत बंडुपंत कुलथे यांची पोलिस कॉन्स्टेबल पदी वर्णी लागली असुन पुणे ग्रामीण येथे नियुक्ती झाली आहे . निलेश लोढा असोसिएटस् च्या वतीने दि .१९ सप्टेंबर रोजी नगर येथे हनुमंत कुलथे यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी लांडगे मेडिकलचे धीरजजी लांडगे , डॉ . संजय वायकर उपस्थित होते .
हनुमंत बंडुपंत कुलथे हे कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील रहिवासी असुन श्रीगोंदा येथील कौटिल्य करिअर अकॅडमी येथे त्यांनी भरतीपूर्व सराव केला आहे . त्यांना अकॅडमीतील शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे हनुमंत कुलथे संघातील निलेशजी लोढा आणि अनेक अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सानिध्यात असल्यानेच यश संपादन करू शकलो असे आवर्जुन सांगतात .