shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांच्या सुरक्षा व महिलांना वेळेवर पोलिस मदत मिळवण्यासाठी भिंगार शहरात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे दूरध्वनी क्रमांकाचे फलक लावण्यात यावे....


अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १ /   मागील दोन दिवसांपूर्वी नगर शहरात हॉटेल थापर समोरून महाविद्यालयाकडे पायी जात असताना एका १६ वर्षीय शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून तिचा अपहरण करण्याची घटना घडली.सध्या राज्यात महिला व लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.या घटनेचा गांभीर्याने विचार करून अश्या प्रकारच्या अमानुष प्रकृतीच्या नराधमा पासून महिलांना व शाळकरी मुलींना स्वतःचा बचाव आणि वेळेवर पोलिस सुरक्षा मिळावी यासाठी भिंगार शहरातील असलेल्या विद्यालय,महाविद्यालय,बस स्थानक,रीक्षा स्टॉप,आणि आवश्यक असलेल्या सार्वजनिक ठिकाणी पोलीस हेल्पलाईन नंबर ११२ व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे दूरध्वनी क्रमांकाचे फलक असणे आवश्यक आहे.

 प्रत्येक नागरिकाकडे पोलीस अधिकारी किंवा पोलीस स्टेशनचे नंबर नसतात जर आवश्यक असलेल्या ठिकाणी असे दुरध्वनी क्रमांकाचे फलक असले तर महिला व शाळेतील मुलीं सोबत काहीही घटना घडत असले तरी त्याची माहिती त्वरित पोलिसा पर्यंत देण्यासाठी त्यांना खुप मोठी मदत मिळेल असे निवेदन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदगीर यांना देण्यात आले .

 या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव दीपक नकवाल, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुर्यवंशी,विकास पंडित,गोविंद घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते
close