shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डिपॉल शाळेत पावसाळी शुटींग बॉल स्पर्धा २०२४ - २५ चे उदघाटन संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील डिपॉल शाळेत आज शुक्रवार दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी डिपॉल शाळेच्या प्रांगणात क्रिडा व युवकसेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि तालुका क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहमदनगर जिल्हास्तरीय पावसाळी शुटींग बॉल स्पर्धा २०२४ - २५ चे उदघाटन समारंभ संपन्न झाले.

याप्रसंगी डिपॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फँको, फादर शीजो, प्राचार्या सिस्टर सेलीन यांनी मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
यावेळी ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक बाळासाहेब कण्हेरकर सर हे अध्यक्ष तर तालुका क्रिडा प्रमुख कोहकडे सर उपाध्यक्ष म्हणून लाभले. तर संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पुजारी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मॉली कुथुर यांच्या मार्गदर्शना खाली रिंगडांस व पॅराशुट डांस सादर केले, तर
इयत्ता सातवी व आठवी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी गणेश सर, दिपक कदम, सुनील बोर्गे, बीना कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. तर डिपॉल शाळेचे क्रिडा शिक्षक संदिप निबे सर व रविंद्र लोंढे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
      कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. सोनाली झांजरी यांनी केले तर आभार सौ. नीता वराळे यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close