shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेऊर रेल्वे स्थानकावर लोडींग अनलोडींग पार्सल सुविधा सुरू करण्याची दिग्विजय बागल यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ जेऊर रेल्वेस्थानकावर पार्सल सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की  ग्रामीण भागातील सर्वात जास्त प्रवासी उत्पन्नही असलेले जेऊर रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा करमाळा, जामखेड, परंडा या तीन तालुक्यातील नागरीकांचा संपर्क आहे. त्यामुळे येथील शेतकरी, व्यापारी आणि यांची सोय व्हावी यासाठी लोडिंग-अनलोडिंग पार्सलची सुविधा सुरू करने आवश्यक आहे.

दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जेऊर स्थानक सुलभ व सोयीचे असल्यामुळे येथून नागरीक प्रवास करतात. येथील नागरिकांची, व्यापाऱ्यांची, शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून या स्थानकावर पार्सल सुविधा ऑफिस चालू करणे गरजेचे आहे. पार्सल ऑफीस सुरू झाल्यास तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचा
भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मासळी व तसेच व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे सामान फ्रीज, टीव्ही, कुलर, टू व्हीलर, सायकल तसेच विविध प्रकारचे छोटे - मोठे सामान व वस्तू सोलापूर, कुडूवाडी, दौंड, मिरज, पंढरपूर, लातूर, पुणे, लोणावळा, कल्याण, मुंबई, अशा अनेक शहरांच्या ठिकाणी साहित्य पाठविणे शक्य आहे. पार्सल सुविधा सुरू झाल्यास येथील नागरिकांची सोय होऊन रेल्वे प्रशासनाला उत्पन्नही मिळणार आहे.
close