shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे विभागीय शालेय क्रीडा ज्युडो स्पर्धेमध्ये संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील जीवन पाटील ला द्वितीय क्रमांक


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ त्रिमूर्ती क्रीडा संकुल नेवासा अहमदनगर येथे झालेल्या पुणे विभागीय शालेय क्रीडा ज्युडो स्पर्धेमध्ये संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील जीवन संतोष पाटील याने द्वितीय क्रमांक मिळवला.

 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे, संस्थेचे सदस्य डॉ. श्री रोहित टोणपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्‍मीन वाघमाडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक अभिनंदन केले.

 जीवन याला क्रीडाशिक्षक श्री . श्रीकांत सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे. पाटील याच्यावर विविध स्तरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
close