ज्ञानदेव डोंगरे यांना शहरी विभागातील अष्टपैलू अधिकारी म्हणुन श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने केले सन्मानित.
इंदापूर: श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगोला,शाखा इंदापूर मध्ये कार्यरत असणारे ज्ञानदेव नारायण डोंगरे यांचा शहरी विभागातील अष्टपैलू अधिकारी म्हणून ३१ ऑगस्ट २०२४रोजी सांगली येथे झालेल्या झेप सोहळा कौतुक या कार्यक्रमात ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
ज्ञानदेव डोंगरे यांनी डिसेंबर २०२३ पासून मॅनेजर म्हणून काम पहिले आहे. इंदापूर शाखेचा विस्तार आतापर्यंत एक कोटीच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि एप्रिल २०२४ पासून त्यांना एरिया मॅनेजर (क्लस्टर हेड ) म्हणून काम पाहन्याची संधी मिळाली. ते आत्ता शाखा मोडलिंब, टेंभुर्णी, इंदापूर,भिगवन आणि उरुळी कांचन या शाखांचे काम पाहत आहेत. त्यांची काम करण्याची एक वेगळीच पद्धतीने त्यांनी इंदापूरमध्ये विठ्ठल मल्टिस्टेट चा ठसा उमटवलं आहे.एक विश्वासाने आणि जबाबदारीने येणाऱ्या ग्राहकांना योग्य सेवा देत शाखेचा विस्तार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर करने हे ध्येय समोर ठेऊन काम करत असल्याने संस्थेचे संस्थापक चेअरमन दीपक बंदरे , संस्थेचे सीईओ महेश दिघे आणि इतर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील कार्यासाठी संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.