श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर श्रीरामपुर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस चे विद्यमान आमदार लहु कानडे यांना डावलून काँग्रेस पक्षाने हेमंत ओगले यांना श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून या उमेदवारीसाठी मोठी चर्चा होती, आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक कोण लढवणार याबाबत उत्सुकता होती. आ.लहु कानडे यांच्या उमेदवारीबाबतही स्थानिक पातळीवर मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र काँग्रेसने यावेळी त्यांना संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेमंत ओगले हे स्थानिक पातळीवर एक प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात आणि त्यांनी श्रीरामपूरातील सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीसही आहेत.त्यांच्या उमेदवारीमूळे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा पक्षाने व्यक्त केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसचा हा निर्णय मतदारसंघात नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
कारण श्रीरामपूर मतदार संघ हा पुर्वीपासून कॉंग्रेस चा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघातून नेहमी कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून येतो, माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांनी त्यांच्या कार्याकाळात या मतदार संघात मोठी विकासकामे केली आहे, करीता त्यांना माननारा मतदार/ कार्यकर्ता वर्ग शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने शिवाय स्व.जयंतराव ससाणे यांचे चिरंजीव जिल्हा बैंकेचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे तथा स्नूषा युवक कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. दिपाली ससाणे यांच्या गटातील असल्याने हेमंत ओगले यांना आमदारकी सर करणे सहज शक्य होणार असल्याची जनमानसात मोठ्या कुतुहुलतेने चर्चा होताना दिसून येत आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११