shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या वेदांत सिद्धेश्वरे, वेदिका सिद्धेश्वरे व अश्विनी दहीभाते यांची क्रीडा स्पर्धेत विद्यापीठ झोन मध्ये निवड!!



प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत सिद्धेश्वरे व वेदिका सिद्धेश्वरे यांची बॅडमिंटन स्पर्धेत छ.संभाजी नगर विभागीय झोन साठी निवड झालेली असुन याच महाविद्यालयाची अश्विनी दहीभाते गोळा फेक मध्ये छ.संभाजी नगर मध्ये सहभागी होणार आहे.
       
क्रीडा क्षेत्रात बाबुराव जी आडसकर महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी  हे यश मिळविल्यामुळे संस्थेचे सचिव तथा अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,अधिक्षक पी.एस.भोसले,डी.एस.यादव व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील या उत्तुंग कामगिरी मुळे या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
close