एरंडोल :- शुक्रवार, दि. ०६ डिसेंबर, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. शास्त्री म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजसुधारकच नव्हे, तर एक महान अर्थतज्ज्ञ, विचारवंत, आणि संविधान निर्माता होते. त्यांनी बिकट परिस्थितीतून उच्च शिक्षण घेत समाज प्रबोधनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि योगदान प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे."
डॉ. शास्त्री यांनी डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मितीतील योगदानावरही प्रकाश टाकला. "६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, आणि हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो," असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे, प्रा. राहुल अहिरे, आणि प्रा. दिग्विजय पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.