shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शास्त्री फार्मसीतर्फे एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन.

शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी एड्स जनजागृती सप्ताहा निमित्त शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.  

शास्त्री फार्मसीतर्फे एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय एरंडोलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.तेजल वानखेडे उपस्थित होत्या. त्यांनी प्रभात फेरीचा शुभारंभ केला.  शास्त्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजात HIV/AIDS विषयक जनजागृती करण्याचा संदेश दिला. रॅलीतून HIV/AIDS संबंधित चुकीच्या समजुती दूर करणे, योग्य माहितीचा प्रसार करणे, आणि सुरक्षित लैंगिक संबंधांच्या महत्त्वाविषयी जनतेला जागरूक करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले.  

शास्त्री फार्मसीतर्फे एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन.


        विशेष उपक्रम: 

- शालेय कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन.  

- "एचआयव्ही चाचणी महत्त्वाची आहे"आणि "सुरक्षित लैंगिक संबंध" यावर मार्गदर्शन.  


कार्यक्रमासाठी शास्त्री संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रा. जावेद शेख, प्रा.राहुल बोरसे, प्रा. करण पावरा आणि इतर शिक्षकांनी आयोजनात विशेष परिश्रम घेतले.  


ग्रामीण रुग्णालय एरंडोलचे समुपदेशक श्री.अंकुश थोरात आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. वीरेंद्र बिऱ्हाडे यांनीही नियोजनासाठी मोलाचे योगदान दिले. समारोप प्रसंगी श्री. अंकुश थोरात यांनी "मार्ग हक्काचा, सन्मानाचा" असा संदेश देत विद्यार्थ्यांना HIV/AIDS संदर्भात प्रबोधन केले.  

close