श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल व दैनिक लोकमत कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्थेच्या व्हा.चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय भव्य चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला गट- इ.नर्सरी ते सिनि.केजी, दुसरा गट- इ.पहिली ते तिसरी, तिसरा गट- इ.चौथी ते सहावी, चौथा गट- इ.सातवी ते दहावी तसेच पाचव्या गटात महिला व पुरुष सर्वांसाठी खुल्या वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये पहिला गट - इ.आठवी ते दहावी, व दुसऱ्या गटात महिला व पुरुष सर्वांसाठी खुल्या वर्गाचा समावेश करण्यात आला आहे.
वरील स्पर्धा येत्या रविवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,शिंदेनगर-ऐनतपूर-बेलापूर रोड,श्रीरामपूर येथे होतील.
यावेळी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला विषयाची गोडी निर्माण व्हावी. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. या हेतूने स्पर्धेत श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे करण्यात येत आहे.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111