श्रीरामपूर / प्रतिनिधी:
नगर - मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्या वतीने स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिनी राष्ट्रीय एकता सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर यांनी विद्यार्थ्यांना भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे जीवन व सेवा यांची माहिती दिली. व त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांमध्ये निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यात मुलांनी मौलाना आझाद यांच्यावर आपले विचार मांडले.सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्यिक पुस्तके वह्यांसह बक्षिसे देण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या अप्रतिम कार्यक्रमातून मुलांना मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक सेवा आणि राष्ट्र उभारणी बद्दल मौल्यवान माहिती मिळाली.
यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद उर्दू स्कूल केडगावच्या विधार्थींनींनी पहिला क्रमांक विभागुन नाझिया उबेदूर्रहेमान व अरबीश मुस्तकीम अहमद शेख , दुसरा आयशा अब्दुल रहमान खान, तीसरा सादेका उबेदूर्रहेमान खान,तर महात्मा गांधी उर्दू स्कूल अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विद्यार्थी प्रथम शेख असद तन्वीर,द्वितीय पटेल नमीरा इमरान, तृतीय उम्मेहानी समीर कुरेशी यांनी तर अहमदनगर महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक ११ व १३ मधील विद्यार्थी प्रथम मदारी नाझिया असलम, द्वतीय अन्सारी अल्तमश नसीम, तृतीय सुकृती यादव यांनी जिंकले.
निबंध स्पर्धेत मातोश्री उर्दू हायस्कूल अल्लामगीरचे विधार्थींनी प्रथम क्रमांक शेख आमेना अश्फाक, द्वितीय शेख जिया जावेद व महात्मा गांधी उर्दू स्कूल अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रथम शेख असद तन्वीर, द्वितीय सदफ जमील शेख, तृतीय शेख सोफिया नईम यांनी क्रमांक पटकावले.
संपूर्ण स्पताहास हाजी शौकतभाई तांबोळी,प्राचार्य खालीद जहागीरदार, मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष अभिजीत एकनाथ वाघ, तन्वीर चष्मावाला, सहेली ग्रुप, वसीम ज्वेलर्स, न्यू मॉडर्न कन्स्ट्रक्शन, रहमत सुलतान फाउंडेशन, मोहंमदिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, शरफुद्दीन सर, डॉ.जहीर मुजावर, एफ.एन.ट्रेडर्स, चेडे हाॅस्पिटल, युनूसभाई तांबटकर, जावेद तांबोळी, असिफ सर, एहसान शेख, डॉ.रिजवान शब्बीर, रिलायबल कॉलेज,अलकरम हॉस्पिटल, शफी हज टुर, इंडिया बेकर्स, फैयाज सर,हमजा अली, हनीफ सर आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी पूर्ण सप्ताह मध्ये राबविलेल्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार निसार बागवान यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

