shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अग्निवीर राहुल खर्डे यांचा सन्मान ; तरुणांनी देशसेवेसाठी तत्पर राहावे - मेजर सरदार



  श्रीरामपुर / प्रतिनिधी:
येथील आजी माजी सैनिक संघर्ष समिती यांच्या वतीने शहिद स्मारक श्रीरामपूर या ठिकाणी अग्निवीर राहुल विलास खर्डे यांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास, मेजर विलास खर्डे,मेजर राहुल खर्डे तसेच मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकास  रीथ अर्पण करून मानवंदना देण्यात आली, माजी सैनिक विलास खर्डे यांचे चिरंजीव यांची अग्निविर मध्ये निवड झाली असून त्यांचे प्रशिक्षण मराठा लाईट इन्फंट्री बेळगांव या ठिकाणी पूर्ण झाले तसेच त्यांचे सध्या जयपूर येथे असलेल्या आठ मराठा लाईट इन्फंट्री युनिटमध्ये पोस्टिंग मिळाली याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला तसेच समितीच्या व परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी मेजर सुनील गवळी यांनी शुभेच्छा दिल्या,

 कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास यांनी भूषवले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विशद केले की, आजचा कार्यक्रम आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे आपल्या मेहनतीने व जिद्दीने अग्नीवीर मध्ये दाखल होऊन संपूर्ण गावाचे नाव उंचावले आहे भारतीय सैन्यात केवळ नोकरी नसून देश सेवेची पवित्र जबाबदारी आहे या क्षेत्रात पाऊल टाकून गावातील अनेक नवयुवकांना यामधून प्रेरणा मिळाली आहे, पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करत कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे खुप खुप आभार मानतो असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले.
याप्रसंगी मेजर सुधाकर हरदास, समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भागडे ,विलास खर्डे ,सुनील गवळी, संग्रामजीत यादव , चांगदेव  धाकतोडे, राम म्हैस ,भगीरथ पवार, अशोक कायगुडे, आर एन माळी, अशोक साबळे परिवर्तन फाउंडेशन चे अध्यक्ष मा.नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, न्यू इंडिया इन्शुरन्सचे गोरख आढाव, गोरक्षनाथ ढेरंगे व मेजर ढवळे इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते 
उपस्थित सर्वांचे आभार मेजर संग्राम यादव यांनी मानले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close