श्रीरामपूर / प्रतिनिधी:
स्वच्छतादूत खरे समाजाचे आरोग्यदूत असून कोरोनासारख्या महामारीमध्येही या स्वच्छता दूतांनी मोलाची कामगिरी बजावून लोकांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे पुण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान यांच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे हे होते. यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या ५५ सफाई कामगारांना टी-शर्ट ,कॅप व मास्कचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंडळाचे राज्यसचिव प्रा. डॉ. अनिल लोखंडे, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे उपसंपादक प्रदीप आहेर, राज्य संघटक प्रा. डॉ. शरद दुधाट, राज्य सहसचिव संजय गायकवाड, नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी आर. के. घायवट, एस. बी.आरणे , जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख शिंदे, मिशन समितीचे बाळासाहेब जपे, सामाजिक कार्यकर्ते भैया पठाण, दिगंबर मगर आदीजण उपस्थित होते. यावेळी बोलताना मोरे म्हणाले की, ५०° डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास जीवसृष्टीसाठी हानिकारक ठरू शकते. शेतातील पिके येण्यास ही अडचण येऊ शकते. पृथ्वीचे तापमान आटोक्यात ठेवायचे असल्यास वृक्षारोपण हा एकमेव पर्याय असून मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत तसेच नद्यांचे संवर्धन करावे, असे नमूद केले. यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना साहित्य किट वाटप केल्याबद्दल प्रत्येक सफाई कामगाराच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
सर्व मान्यवरांनी स्वच्छतादूतांच्या या कार्याचा गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम केल्याबद्दल सर्व स्वच्छतादूतांना आपल्या कार्याचा अभिमान हेवा वाटत होता. सर्व स्वच्छतादूत भारावून जाऊन त्यांना या उपक्रमातून मोठे प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमाचे सर्व मान्यवर व उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी पर्यावरण मंडळाचे राज्य सचिव प्रा. डॉ. अनिल लोखंडे, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे उपसंपादक प्रदीप आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. घायवट, पर्यावरण मंडळाचे राज्य सहसचिव संजय गायकवाड, बाळासाहेब जपे, जि. परिषद शाळा केंद्रप्रमुख शिंदे, आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटक प्रा. डॉ. शरद दुधाट यांनी केले. तर सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत यांनी केले. आभार पर्यावरण मंडळाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख बेबी कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानज्योती संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, सुदाम पटारे, प्रा. डॉ. मनिषा माने/नवले आदींसह पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111