पुणे येथील बैठकीत संमेलन घेण्याचे निश्चित
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य या पर्यावरण प्रेमी संस्थेचे आठवे पर्यावरण संमेलन २९ डिसेंबर २०२४ रोजी देवाची आळंदी जिल्हा पुणे येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी दिली.
या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा पुणे येथे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या संघ दालनात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्यसचिव धीरज वाटेकर, पुणे जिल्हाध्यक्ष मारुती कदम, पुणे जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने यांच्यासह अनेक पर्यावरण स्नेही उपस्थित होते. या आठव्या पर्यावरण संमेलनात पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर पुढील सत्रात पर्यावरण व प्रदूषण विषयक विचारांवर अनेक सुप्रसिद्ध व्याख्यात्यांची अनुभव आणि व्याख्याने आयोजित केली आहेत. तसेच राज्यातील पर्यावरण विषयक विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान आयोजित केला आहे. या एकदिवसीय संमेलनात मुक्कामाच्या राहण्याच्या सोयीसह जेवणाची व्यवस्था व क्षेत्रभेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आठव्या पर्यावरण स्नेहसंमेलनास मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा हजारे हे आपली प्रकृती स्वास्थ उत्तम असल्यास उपस्थित राहणार आहेत. तरी या पर्यावरण संमेलनास पर्यावरण स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी बैठकीत केली आहे.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111