वसमत प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, हिंगोली जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यादव गायकवाड, सिद्धार्थ गोंवदे मार्गदर्शनाखाली बार्टीतर्फे समतादूत मिलिंद आळणे आणी समतादूत टिमच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर आंबेडकरवादी विचार मंच चेदेविदास मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात येवून संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री संत संताजी महाराज जनागडे यांचे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे जन्मस्थळ असून राज्यभरात सर्वत्र त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अनुयायी होते आणि त्यांच्या अभंगांचे लेखनकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी धार्मिक आणि सामाजिक समतेसाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या शिकवणींमुळे आजही ते प्रेरणास्थान मानले जातात.
यावेळी कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष उत्तम करंवदे मामा,संदीप जोधळे,प्रविण बाराहाटे, सारनाथ करवंदे, सुशिल इंगोले आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी रजनिकांत कमळू यांनी आभार प्रदर्शन केले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार मिलिंद आळणे वसमत
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111