शहाजी नगर येथील दत्त देवस्थान येथे गुरुचरित्र पारायण प्रारंभ
इंदापूर(प्रतिनिधी):मानवी जीवनात अध्यात्म,वारकरी संप्रदाय,हरिनाम अत्यंत महत्त्वाचे असून,यामध्ये श्री दत्तगुरूंच्या मनोभावे नामस्मरणाने,जीवनातील आनंद कायम टिकवून ठेवता येतो.सामाजिक जाणीवा कायम जपता येतात.अशी माहिती राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली.
श्री दत्त देवस्थान शहाजी नगर (ता.इंदापूर) येथे,रविवार ८ डिसेंबर रोजी,दत्त जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ,राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते विना पूजन करून,हरीनामाच्या गजरात पार पडला.
दत्त देवस्थान सामाजिक कार्यात अग्रेसर असून, अन्नदान,हरिनाम अखंड चालू ठेवते.त्यामुळेच या परिसराला अनोखे चैतन्य प्राप्त झाले आहे.इंदापूर माळशिरस व इतर तालुक्यातील भक्तगणांचे श्रद्धास्थान हे देवस्थान ठरले आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी काढले.
यावेळी श्री.दत्त देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते,तानाजीराव गायकवाड,तसेच पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे,निरा भिमा कारखान्याचे संचालक एडवोकेट कृष्णाजी यादव,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नितीन कदम,इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ अलकाताई ताटे,माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी ताटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण बोरा,रेडा गावचे सरपंच नानासाहेब देवकर,माजी नगरसेवक मंगलताई ढोले,नगरसेविका स्वामीताई,नारायण नागाळे,गायकवाड महाराज,दत्तात्रय पवार,गणेश वाघ,दगडू गायकवाड,मारुती मोहिते,पांडुरंग मोहिते,प्रसाद देवकर पाटील, व शेतीनिष्ठ शेतकरी मच्छिंद्र तरंगे,तसेच ह.भ.प. गडगडे महाराज,वारकरी,भक्तगण,यांच्या प्रमुख उपस्थितीत,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाच्या गजरात प्रारंभ करण्यात आला.
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे तसेच कारखान्याचे संचालक कृष्णाजी यादव यांनी उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णाजी ताटे यांनी केले.
** फोटो.
इंदापूर तालुक्यातील शहाजी नगर येथील दत्त देवस्थान येथे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात,राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते विना पूजनाने करण्यात आली.यावेळी मान्यवर.