shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरधाव वेगाने गाडी चालवणार्या रोडरोमियोंचा पोलीस प्रशासनाने त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करू- संदिप कुसळकर


सोनई प्रतिनिधी:-
सोनई गाव ते मुळा पब्लीक स्कुलपर्यंत अनेक ठिकाणी राजरोसपणे रोडरोमियो व अनोळखी व्यक्ती घोळक्याने  विनाकारण उभे राहतात व भरधाव वेगाने वाहने चालवतात. राहुरी रोडवर शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थी व विद्यार्थनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुख्यत्वे शनेश्वर हायस्कुल भरण्या अगोदर व सुट्टीच्या वेळी त्याचबरोबर शनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उच्च तंत्रशिक्षण महाविद्यालय,सोनई या परिसरात सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० सुट्टीच्या वेळेपर्यंत रोडरोमियोंची मोठी रेलचेल असते.  काहि मुलींसोबत छेडछाडीचे अनुचीत घटना घडत आहेत. त्याचबरोबर काही अल्पवयीन मुली या रोडरोमियोच्या अमिषाला व भुलथापांना बळी पडून पलायनाच्या घटना घडत आहेत.  यामुळे पालकांना मोठा मनस्ताप होत आहे.रोडरोमियो यांच्याकडून होत असलेल्या घटना तसेच येथे भरधाव वेगात वाहने चालविल्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 


तसेच शनिशिंगणापुरकडे जाणार्या वाहनांची अडवणूक करणार्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रासातून जावे लागते. एकंदर पहाता या सर्व घटना अतिशय गंभीर  आहेत.

यावर आळा घालण्यासाठी महाविद्यालय परिसरात तातडीने एका पोलीस कर्मचार्याची नियुक्ती करावी. व सदरचा रस्ता सुरक्षित करावा. या गंभीर बाबींची  दखल न घेतल्यास वडार सक्षम फाऊंडेशनच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा संदिप कुसळकर यांनी दिला आहे.या सर्व बाबींचा विचार करता या सर्व घटनांची नोंद घेऊन पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोरात कठोर गुन्हे दाखल करावे. व सामान्य जनतेला न्याय द्यावा.

यासाठी सामाजिक कार्यकर्ते वडार सक्षम फाऊडेशनचे अध्यक्ष संदिप कुसळकर यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
close