पुणे/ संभाजी पुरीगोसावी :- नारायणगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये घर, फ्लॅट व चाळ मालकांनी भाडेकरार करुन भाडेकरूंची माहिती व्यवसायिक बागायतदार शेतकऱ्यांनी कामानिमिंत्त ठेवलेल्या कामगार,मजुरांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे व तसेच आपल्या सुरक्षेसाठी गृहनिर्माण सोसायटीत सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवावेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.
तसेच वेळेत न माहिती दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नारायणगांव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला आहे, वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नारायणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार यांनी हा निर्णय घेतला आहे, सोसायटीचे अध्यक्ष फ्लॅट चाळ घर मालक दुकानदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यापूर्वीही भाडेकरूंचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, भाडे करार न केल्यामुळे चार ते पाच घर मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते,
आज अखेर नारायणगांव परिसरातील साडेतीन हजार घर मालकांनी भाडे करार केले आहेत, बांधकाम व्यावसायिक व शेतकऱ्यांकडून कामगार व मजुरांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, तरी नारायणगांव परिसरांतील घरमालक फ्लॅट चाळ मालकांनी तसेच बागायतदार शेतकऱ्यांनी भाडेकरांची माहिती पोलीस ठाणेत द्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.