shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईवडीलांच्या अर्ध्या भाकरीची किंमत आयुष्यभर ठेवावी- देवा झिंजाड


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 'आई वडीलांनी दिलेल्या अर्ध्या भाकरीची किंमत आयुष्यभर ठेवावी. त्यांना आपल्या जवळचे आदर्श मानून अशी नाती निर्माण करा की, जी आयुष्यभर टिकतील' असे विचार सुप्रसिद्ध लेखक, कवी, झी टि.व्ही. फेम देवा झिंजाड यांनी व्यक्त केले.


       तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या २९ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकनाना साळुंके हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, सचिव ऍड. शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, विश्वस्त राजेंद्रप्रसाद खटोड, ऍड. विजय साळुंके, श्रीवल्लभ राठी, शेखर डावरे, रविंद्र खटोड, भरत साळुंके, तसेच प्रमोद कर्डिले, अरविंद राठी, पत्रकार दिलीप दायमा, बेलापूर पोलिस औट पोस्टचे हेड कॉन्सटेबल कोळपे, विजय लोहार, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, कार्याध्यक्ष प्रा.विलास गायकवाड, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ.अशोक माने, प्रा. निजाम शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
     पुढे देवा झिंजाड म्हणाले की, युवकांनी अशी नाती निर्माण करावी की, जी आयुष्यभर टिकतील. समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहून त्यातील बारकावे टिपावे, आई- बापावर श्रध्दा ठेवून वाटचाल करावी. तसेच ज्या घरात स्त्रियांचा छळ केला जातो तेथे लक्ष्मी नांदत नाही. स्त्रियांकडे सन्मानाने पहावे, त्यांची उपेक्षा, खच्चीकरण करू नये तरच समतेचा न्याय प्रस्थापित होऊ शकेल असेही ते म्हणाले. यावेळी राजेश खटोड व ॲड. विजय साळुंके यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. सर्वेश्वरी परांजपे हिने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा. विलास गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य गुंफा कोकाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अहवाल वाचन प्रा. प्रकाश देशपांडे यंनी केले. यावेळी कला, क्रिडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी जनरल चॅम्पियन मानकरी जया काळे हिला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता गायकवाड, प्रा. स्वाती कोळेकर, प्रा. सुनिता पठारे, प्रा. डॉ. विनायक काळे, प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर आदींनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अशोक माने यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी पंकज कुताळ, विद्यार्थीनी प्रतिनिधी पायल म्हस्के, साक्षी शिंदे, तसेच प्रा. डॉ. विठ्ठल सदाकुले, प्रा. रुपाली उंडे, प्रा. डॉ. संजय नवाळे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा.डाॕ. मनोज तेलोरे, प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे, संदेश शाहीर, कृष्णा महाडीक, अनिता चिंचकर,  प्रा. सतिश पावसे, प्रा. अशोक थोरात, प्रा. सुनिल विधाटे, आण्णा ओहोळ, रामेश्वर पवार, नानासाहेब तुवर, संदीप चौधरी व अनिल पवार आदींनी सहकार्य केले. सदर समारंभासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close