श्रीरामपूर:-
नव स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने संत रविदास यांची जयंती श्रीरामपूर आझाद मैदान या ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन करून साजरी करण्यात आली.
यावेळी नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर म्हणाले की रविदास यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला त्यांनी जातीव्यवस्थेला विरोध करून मानवतेचा संदेश दिला रविदासांनी आपली संपूर्ण आयुष्य समाजातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाज सुधारणा आणि समाज कल्याण यासाठी समर्पित केले. त्यांच्या शब्द आणि ओव्या द्वारे जगात भक्तीची एक अनोखी छाप सोडली.
यावेळी संपतराव मोरे ,किरण भाऊ कतारे ,भरत कोठारी ,दादासाहेब खंडागळे, अशोक बावस्कर, संदीप बागुल ,गोरख जाधव ,रमेश शेळके, डॅनियल शिंदे ,अनिल जाधव ,संजय वाहुळ ,राजू भाई जहागीरदार, डी एल भोंगळे सर , आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

