इंदापूर : ८ मार्ज २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा शेळगाव या ठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वेळी राजमाता जिजाऊ , अहिल्याबाई होळकर , मातारमाई , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , इंदिरा गांधी या वीर माताच्या प्रतिमेचे पुजन मुलींच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात केली .
प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केले . त्या मध्ये जागतिक स्तरावर महिला दिन का साजरा केला जातो महिलांचे समाजातील स्थान त्यांचे कार्य तसेच महिला दिनाचे महत्त्व सांगितले .या वेळी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींचा गुलाब पुष्प, वह्या वाटप करुन विशेष सन्मान केला . हा सन्मान शाळेतील सर्व मुलांच्या खाऊच्या पैशातून करण्यात आला . त्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला .
या वेळी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम व अंगणवाडी सेविका कल्पना जाधव मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. इयत्ता चौथीतील हर्षल जाधव व श्रेयश नाझरकर या मुलांनी सर्वाचे आभार मानुन महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली .