shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि कायदे विषयक मार्गदर्शन सत्र संपन्न.

 विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि कायदे विषयक मार्गदर्शन सत्र संपन्न.
इंदापूर : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सबलीकरण व भारतीय कायदे या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी मुख्य वक्त्या म्हणून बारामती बार कौन्सिलच्या उपाध्यक्षा ऍड. स्नेहा भापकर उपस्थित होत्या. त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी तसेच भारतीय संविधानामध्ये महिलांना मिळणाऱ्या संरक्षणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

महिलांच्या हक्कांसाठी कायद्याचे भान गरजेचे – ऍड. स्नेहा भापकर

मार्गदर्शन करताना ऍड. भापकर म्हणाल्या की, महिलांवर होणाऱ्या बाललैंगिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार आदी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांनी कायद्याचे भान ठेवणे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे गरजेचे आहे. यासंदर्भात भारत सरकारने अनेक प्रभावी कायदे केले असून त्यांचा योग्य वापर करून महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा.

सोशल मीडियाच्या वापराबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. मात्र, त्याचा गैरवापर होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. महिलांनी आपले फोटो, विचार अथवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करताना योग्य खबरदारी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन शोषणाला बळी पडू नये आणि अशा परिस्थितीत कायदेशीर मदतीसाठी त्वरित पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.

कायद्यांचे संरक्षण, परंतु त्याचा गैरवापर टाळण्याचा सल्ला

महिलांना संविधानाने दिलेले अधिकार आणि संरक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, या संरक्षणाचा गैरवापर होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कायद्याचा उपयोग महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी व्हावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.

या कार्यक्रमाला पुण्याहून ऍड. पल्लवी जाधव, ऍड. प्रीती लोखंडे तसेच इंदापूर येथील ऍड. तेजल वीर या देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमास लाभलेले अतिथी ऍड. योगेश निंबाळकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी, ग्रंथालयास कायदेविषयक २५ पुस्तकांचा संच भेट म्हणून प्रदान केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी स्वागतपर भाषणात भारतीय संस्कृतीत महिलांना सुरुवातीपासूनच पूजनीय स्थान असल्याचे सांगितले. महिलांचे सबलीकरण हे केवळ कायद्याने नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातूनच अधिक प्रभावीपणे होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रोहिणी गोरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. विद्युलता जाधव यांनी पाहिले. आभार प्रदर्शन करताना प्रा. रोहिणी गोरे यांनी सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती मिळाली तसेच प्रत्यक्ष कायदेशीर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
[3/8, 21:46] tatyarampawar: *श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे "जागतिक महिला दिन"उत्साहात साजरा.*

 इंदापूर : ना. रा. इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर मध्ये, आज दिनांक.8 मार्च 2025 "जागतिक महिला दिन" मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. फौजिया शेख मॅडम तर प्रमूख पाहुण्या म्हणून डॉ. परवीन पठाण मॅडम, ऍडव्होकेट सौ.अंजली दास मॅडम आणि सिव्हिल इंजिनिअर सौ.सोनाली सरडे मॅडम या उपस्थीत होत्या.या प्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कऱण्यात आली.यावेळी महिला दिन का साजरा करायचा याविषयी सौ.मोनाली शिंदे, सौ.ज्योती पाटील व सौ.रोहिणी नलवडे या महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे खास अकर्षण ठरले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषेत  महिलांची साकारलेली विविध रूपे त्यामध्ये पंडिता रमाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई,राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले , वकील ,डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, परिचारिका, शिक्षक , गृहिणी यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या.*

           *यावेळी श्रीमती दास मॅडम यांनी मुलींना व मुलांना कायदे विषयक केले तर डॉ. परवीन पठाण यांनी स्वच्छता व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांचा व उपस्थीत महिला पालकांचा गुलाब पुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वर्षा गाडे मॅडम यांनी केले तर आभार सौ. रेखा जोशी  यांनी मानले.*
close