जीन ..
(महिला दिन) ..
दिवा घास घासतो
कितीदा अल्लाद्दीन
प्रकट झाला शेवटी
संतापून आला जीन
बोले ओ मेरे आका
आज है महिला दिन
भाभी का करे काम
आज मैं उनका जीन
काम अखंड करितो
अगदी पहाट पासून
पहिले काम संपताचं
उभे दुसरे आ वासून
कामाचे शेपूट लांबले
गेलो भलताचं थकून
ताई काम करे किती
कोण ना पाही ढुकूंन
स्त्री जन्म हा कठीण
आलेयं आत्ता कळून
पुरूषत्वाचा अहंकार
गेलायं सगळा जळून
सलाम तमाम महिले
कुर्निसात करे वाकून
महिला दिवस असून
पुरुषच जाई शिकून
बाई गं तुझे हे श्रेष्ठत्व
जगता सांगे ठणकून
खरामहोत्सव साजरा
आता होणारं दणकून
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com
रणचंड्या ..
महिलांची मधूनचं
आठवण येते गड्या
पुरस्काराचा पाऊस
वाटू लागता रेवड्या
रे दुर्बळतेची प्रतिमा
नाही मुळी बांगड्या
इतिहास आहे साक्षी
मोडल्या त्या तंगड्या
बरोबरीने पुरुषांच्या
ढाली उभ्या तगड्या
ज्योतीसम कधी त्या
धग धगत्या शेगड्या
शक्तीदुर्गा महाकाली
महा दुर्गा रण चंड्या
डोक्यात खुळ भरुनि
आम्ही पिकवे कंड्या
महिला आता सबला
नाही अबला थोड्या
पुरुषापेक्षाही तगड्या
नेसल्या जरी साड्या
बदला विचार धारा
खुळ्याकल्पना वेड्या
सर्वांग सकल प्रगती
हातात त्यांच्या नाड्या
महिला दिवस येताचं
आठवण करतो गड्या
बदलायला हवे विचार
भविष्य घडवी साड्या
- हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३९६९९६.
www.kavyakusum.com
महिला दिन ..
दिसे सर्वत्र महिला
अव्वल स्थानावर
विनीता झेंडा उंच
फडके शिखरावर
सर्वत्र गोड बातम्या
चांगल्या कानांवर
मुलींचे होई कौतुक
फोटो पानापानांवर
आदिवासी अग्रस्थ
ती राष्ट्रपती पदावर
गुरुकिल्ली लाभली
नारी पुरुष भेदावर
शक्तीकायदे सशक्त
जेरबंद होई जनावर
नारी आत्मनिर्भरता
करते राज्य मनावर
भृणहत्या क्वचितचं
असूरआले भानावर
प्रगतीचे आलेखरेख
इतिहासाचे पानावर
सावित्री जिजा सिंधु
ऋणअनन्य जगावर
स्वताचंशोधलेअमृत
द्वेष असाध्यरोगावर
नकोतकेवळ इव्हेंट
वधू चढे बोहल्यावर
ना नारी अवहेलना
शुभदिस सरल्यावर
- हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996..
www.kavyakusum.com
टिकली ..
म्हणतात गुरूजी ते
बाई गं लाव टिकली
कळत नाही कसे गं
जरी तू गा शिकली
साडी ऐवजी ड्रेस का
वटपुजायला चालली
पुरुष प्रधान कसली
संस्कृती मागे राहिली
कुंकू हवे कपाळाला
बंधनात रहा बांधली
अशी रूढी ही शिडी
परंपरा जाते सांधली
तोडू नका कुंपणाला
अक्कल का विकली
बाई शोभे बुरख्यात
मुठ ठेवावी झाकली
असाचं हवा पोशाख
संस्कृतीजाई राखली
पळू नये जोर जोरात
पायात घाले साखली
ताठपणा नको मोठा
राहे स्त्री नीत वाकली
चालले होते चांगलेचं
माशी कुठे गं शिंकली
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com