shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहाडसिंगपुरा बुद्ध लेणी परिसरातील इनामी जमीन बळकावण्याचा धंदा तेजीत..., लॉकडाऊनमध्ये भूमाफियांचा सुळसुळाटगट

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : पहाडसिंगपुरा बुद्ध लेणी परिसरातील दलित इनामी महार जमीन बळकावण्याचा धंदा तेजीत; लॉकडाऊनमध्ये भूमाफियांचा सुळसुळाटगट/सर्वे नंबर 39 मध्ये अवैध फार्महाऊस उभारणी; संतप्त नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया लॉकडाऊनच्या काळात एकीकडे संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे काही भूमाफियांनी तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर गायरान व इनाम जमिनी बळकावण्याचा प्रकार घडवून आणला. बनावट दस्तऐवज तयार करून, खोट्या बक्षीसपत्रांच्या आधारे या जमिनी धनदांडग्यांच्या नावावर करून दिल्या गेल्या. विशेषतः गट/सर्वे नंबर 39 मध्ये हीच परिस्थिती दिसून येते.

भूमाफियांनी अवैधरीत्या त्या जागेवर फार्महाऊस उभारले असून, महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच हे शक्य झाले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे संतप्त नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “भूमाफियांना आता कोणाचाही धाक राहिला नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

close