shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे "जागतिक महिला दिन"उत्साहात साजरा.*

*श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे "जागतिक महिला दिन"उत्साहात साजरा.*
इंदापूर : ना. रा. इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर मध्ये, आज दिनांक.8 मार्च 2025 "जागतिक महिला दिन" मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. फौजिया शेख मॅडम तर प्रमूख पाहुण्या म्हणून डॉ. परवीन पठाण मॅडम, ऍडव्होकेट सौ.अंजली दास मॅडम आणि सिव्हिल इंजिनिअर सौ.सोनाली सरडे मॅडम या उपस्थीत होत्या.या प्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कऱण्यात आली.यावेळी महिला दिन का साजरा करायचा याविषयी सौ.मोनाली शिंदे, सौ.ज्योती पाटील व सौ.रोहिणी नलवडे या महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे खास अकर्षण ठरले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषेत  महिलांची साकारलेली विविध रूपे त्यामध्ये पंडिता रमाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई,राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले , वकील ,डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, परिचारिका, शिक्षक , गृहिणी यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या.*

           *यावेळी श्रीमती दास मॅडम यांनी मुलींना व मुलांना कायदे विषयक केले तर डॉ. परवीन पठाण यांनी स्वच्छता व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांचा व उपस्थीत महिला पालकांचा गुलाब पुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वर्षा गाडे मॅडम यांनी केले तर आभार सौ. रेखा जोशी  यांनी मानले.*
close