सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यात सेनगांव तालुक्यात अवैध वाळु व्यवसाय जोमात सुरु असतांना सोशलमिडीयार भाऊ नामक वाळुमाफीयाने अंगावर सोनं घालत पैशाचे बंडल टेबलवर ठेवून रिल्स बनवत सर्वसामान्य जनतेवर दहशतीचा प्रभाव पडावा या उद्देशाने सोशलमिडीयावर व्हायरल केली होती.या अनुषंगाने सेनगांव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी संबधीत वाळुमाफीयावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले होते.याची दखल घेत हिंगोली पोलीसांनी भाऊ उर्फ धनशिंग राठोडसह एकास ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवत दादागिरी उतरवली.
सेनगांव तालुक्यात पुर्णा नदीच्या पात्रातून बन,बरडा,ब्रम्हवाडी,हुडी लिंबाळा,बोडखा,चिखलागर सह इतर वाळु घाटातुन रात्रंदिवस अवैध वाळुचा उपसा चालत असून या गैर कारभारातुन वाळुमाफीयांनी लाखो रुपयाची माया जमा केल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.सेनगांल तालुक्यात अवैध वाळुची होणारी विक्री हा रात्रीस खेळ चाले या प्रमाणे तालुक्यात ३० ते ४० टिप्परद्वारे वाळु उपसा होत असून एवढा बिन बोंबाटपणे चालणाऱ्या गैरप्रकारास अभय कोणाचे हे मात्र अनुत्तरीत असून या प्रकाराला महसुल व पोलीस प्रशासन लगाम घालणार का याकडे पाहण्याचे नित्याचे झाले आहे.त्यातच भाऊ उर्फ धनशिंग राठोड नामक वाळुमाफीयाने रिल्स बनवत सोशलमिडीयावर व्हायरल करून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याने सेनगांव येथील कार्यकर्त्यांनी या संदर्भांत हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन संबधीत वाळुमाफीयावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.याची दखल घेत हिंगोली पोलीसांनी तात्काळ भाऊ उर्फ धनशिंग राठोडसह त्याचा साथीदार शिवाजी संतोष राठोड यांना ताब्यात घेऊन त्यांचा गुन्हेगारी इतिहास पाहुन कठोर प्रतिबंधक कार्यवाही करुन योग्य समज देत पोलीसी खाकीचा प्रसाद देत दादागिरी उतरवली.भाऊ ने तात्काळ झालेली चुक मान्य करीत यापुढे अवैध वाळु व्यवसाय,गुन्हेगारी क्षेत्र सोडुन शेती व्यवसाय करण्याचे कबुल केले.तसेच यानंतर दहशत पसरविणाऱ्यासाठी रिल्स ठेवणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन हिंगोली पोलीसाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली