*बांडेवाडी शाळेत पहिलीत दाखल झालेल्या मुलांचे फेटेबांधून वाजत गाजत मुलांचे स्वागत.*
इयत्ता 4 थी मुलांना शैक्षणिक भेट देऊन निरोप समारंभ संपन्न.
चौथी मुलांकडून शाळेस भिंतीवरील दोन घड्याळ भेट.
इंदापूर : दिनांक 28 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी आयोजित इयत्ता पहिली दाखल झालेल्या मुलांचे स्वागत , शाळा पूर्व तयारी मेळावा व इयत्ता चौथी मुलांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला मुलांना फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे औक्षण करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतीमा पुजन करण्यात आले.
यावेळी शाळेकडून पहिलीतील मुलांना पाटी पेन्सिल व चौथी मुलांना पॅड भेट देण्यात आले. यावेळी शिवराज, खुशी , शाहिस्ता , यांनी भाषणे केली. पालकांमधून सारिका बांडे , आशिब मुलाणी व बापूसो राहीगुडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पवित्रा जैन, संतोष डोंगरे उपस्थीत होते.कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका कांचन रणपिसे अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले व मदतनीस उर्मिला बांडे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.