प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुका भाजपा अध्यक्ष पदी भगवान केदार यांची फेरनिवड झाल्याबद्दल एकुरका गावातील ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे केज तालुका भाजपा अध्यक्ष भगवानराव केदार यांचा सत्कार संपन्न झाला. भगवान केदार यांची तिसऱ्यांदा केज तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व एकुरका ग्राम वासिया तर्फे त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक जयदत्त नागरगोजे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत भाऊ केदार, सरपंच प्रशांत दादा केदार, डॉक्टर श्रीहरि धस, चेअरमन शिवदास बापू केदार, भगवान केदार, पप्पू शेळके, सुनील मोरे, गोकुळ धस, गावातील सर्व युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी एकुरका ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
