हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
अहिल्यानगर / प्रतिनिधी:
येथील वीर सैनिक बहुउद्देशीय संस्था नवनागपूर अहिल्यानगरकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर चेतना कॉलनी येथे एकत्र येऊन जम्मू काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिव्र निषेध करुन या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा वीर सैनिक बहुउद्देशीय संस्था, नव नागापूर- अहिल्यानगरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक श्री. बाबासाहेब बापुराव तेलोरे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर,चेतना कॉलनी नवा नागापूर अहिल्यानगर येथे परिसरातील अनेक माजी सैनिक एकत्र आले. याप्रसंगी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. उपस्थितांनी हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या शोक सभेत संस्थेचे उपाध्यक्ष माजी सैनिक श्री. लहू बन्सी सुलाखे, सचिव श्री. रावसाहेब किसन गोरे यांच्यासह माजी सैनिक सर्वश्री संतोष पंडितराव गायकवाड, अनिल हरी सिंग गुजर, किसन सदाशिव कांबळे, राजू गीते, पांडुरंग भिमाजी रोकडे, बाजीराव नामदेव भालेराव, राजेंद्र दशरथ काळे, अनिल आसाराम सत्रे, भरत नरहरी हंडोरे, राम बन्सी बेलेकर, महेश शेळके, संदीप मारुती हरिचंद्रे, शंकर धोंडीभाऊ भापकर, शरद नाना दातीर, सोमनाथ तुळशीराम कराळे, सुनील प्रभाकर खाकाळ, हिरालाल कुंडलिक गोपाळघरे, गहिनीनाथ हरिभाऊ दहिफळे, सोन्या बापू रामचंद्र शिंदे, भाऊसाहेब सिंधू डाके, संतोष आदिनाथ कासार, एकनाथ तुळशीराम कानडे, राजेंद्र धोंडीबा गोरे, नंदकुमार भागा घुगे, एस.बी.खोसे, ज्ञानेश्वर सुखदेव टाकरे, नवनाथ घेनाजी परभणे, किशोर यादव पांढरे, काशिनाथ लक्ष्मण साळुंखे, उदयलाल गुजर, अरुण पवार, मच्छिंद्र भिकाजी भालेराव आणि रामदास ठोकळ यांच्यासह अनेक माजी सैनिकांचा सहभाग होता. तसेच वीर नारी रत्नामालाताई यांनीही या शोकसभेत उपस्थिती दर्शवली.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष बाबासाहेब तेलोरे म्हणाले, "पहलगाम येथे झालेला हा दहशतवादी हल्ला केवळ निंदनीयच नाही, तर तो मानवता आणि शांततेवर केलेला एक घृणास्पद हल्ला आहे. वीर सैनिक बहुउद्देशीय संस्था या दुःखद प्रसंगी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभी आहे."
उपाध्यक्ष लहू सुलाखे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रूर कृत्यांनी हे सिद्ध केले आहे की त्यांना शांतता आणि विकासाची कोणतीही पर्वा नाही. या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो आणि सरकारला आमची मागणी आहे की या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी."
सचिव रावसाहेब गोरे यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करताना सांगितले की, "मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो, हीच आमची प्रार्थना आहे."
शोकसभेच्या अखेरीस उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली वाहिली. वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेने दहशतवादाच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला आहे आणि यापुढेही उठवत राहील, असा निर्धार व्यक्त केला.
*वृत्त विशेष सहयोग
मेजर बाबासाहेब तेलोरे - अहिल्यानगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111