पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदाताई जाधव यांच्याकडून बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट .
इंदापूर: पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. हर्षदाताई दीपक जाधव यांनी इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील आरोग्य सुविधांची सखोल पाहणी केली आणि उपस्थित रुग्ण व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रीय कार्यक्रम संदर्भात आढावा घेत त्यांनी ऑनलाईन पोर्टल्स जसे esushrut, एनसीडी, esanjeevani, PMJAY, eaushadhi, STEMI पोर्टल्स चे कामाची तपासणी केली. प्रत्येक आठवड्यामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि प्रसुती चे काम पाहून समाधान व्यक्त केले.
"ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हा अत्यंत मोठा आधार असतो. बिजवडी आणि परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आरोग्य केंद्रातील ज्या काही किरकोळ अडचणी किंवा त्रुटी असतील, त्या जिल्हा परिषद व संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने सोडवल्या जातील."
— सौ. हर्षदाताई दीपक जाधव
यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. गणराज चौगुले बोलले की "प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी हे या परिसरातील ग्रामीण जनतेसाठी आरोग्याचे मुख्य केंद्र आहे. आज मा. सौ.हर्षदाताई दीपक जाधव यांनी येथे भेट देऊन आमच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला आहे. शासन स्तरावरून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहे आणि आगामी काळातही बिजवडी केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती, औषध पुरवठा आणि आधुनिक उपकरणांसाठी ताईंचे असेच पाठबळ लाभेल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.आमचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य सेवक हे चोवीस तास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतात. "
याप्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ. गणराज चौगुले, डॉ. प्रगती करे, आरोग्य सहायक देवेंद्र उत्तेकर, प्रवीण क्षीरसागर,कमल पांचाळ, दत्तात्रय झगडे, रिझवाना तांबोळी, सुनीता जाधव, अतुल तोंडे, प्रतीक लोंढे, संदीप रायपूरे, प्रवीण पोंदकुले, शिवाजी गोळे, आनंद लांडगे, आणि आशा स्वयंसेविका सह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

