अकोले :- तालुक्याचे श्रद्धास्थान श्री अगस्ती ऋषींच्या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला पुरुषोत्तम (अधिक) मास निमित्त अखंड महिनाभर कीर्तन महोत्सवा सह विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती देवस्थान चे अध्यक्ष के.डी. धुमाळ यांनी दिली.
17 मे ते16 जून या अधिक महिन्यात वारकरी संप्रदायाची प्रस्थान त्रयी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व एकनाथी भागवत तसेच अगस्त्य महात्म्य या ग्रंथांचे पारायण, रामायण कथा, प्रवचन, कीर्तन, भजन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. अकोले संगमनेर तालुक्यातील सह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तन प्रवचन प्रवक्ते व कथा प्रवक्ते यांचेही मार्गदर्शन होणार आहे.
या कीर्तन मोहत्सवात समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, माधव महाराज राठी, जगदीश महाराज जोशी, जयंत महाराज गोसावी, महादेव महाराज राऊत, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के, जयेश महाराज भाग्यवंत सह दिपक महाराज देशमुख, विठ्ठलपंत गोंडे, कृष्णा देशमुख, गणेश वाकचौरे, दत्तात्रय भोर, मदन वरपे, सुनील भोकनळ, गोविंद करंजकर, सुदाम कोकणे, व्यंकटेश सोनवणे, गणेश कानवडे, विवेक केदार, अरुण शिर्के, नितीन गोडसे, अमोल भोत, सोमनाथ भोर, एकनाथ भांगरे, रोहित राक्षे, राजेंद्र सदगीर, संदीप सावंत, रमेश भोर, यांचे कीर्तन तर डॉ बाळचंद वाकचौरे, यशवंत भांगे, परशराम कानवडे, समाधान भोर, कुंडलिक मोखरे, रोहिदास झोळेकर, देवराम ईदे, सुरेश भालेकर, अरुण फरगडे, विश्वनाथ शेटे, गोविंद पुंडे, कैलास आहेर, पांडुरंग फरगडे, देवा वाकचौरे, नितीन देशमुख, नामदेव चौधरी, राजेंद्र ढोंन्नर, डॉ विजय शेडगे, सोमनाथ चौधरी, मनोहर चासकर, केरु केदार, संतोष साबळे, तुकाराम चोखंडे, बाळासाहेब खताळ, रमेश कानवडे, हौशीराम कोल्हे यांची प्रवचन सेवा होणार आहे. 16 जून ला महंत श्री उध्दवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास अगस्त्य महात्म्य पारायण व्यासपीठ डॉ आचार्य अनिल सहस्रबुद्धे, हरिपाठ नेतृत्व दौलत महाराज शेटे, दामू अण्णा तिकांडे, किसन नाईकवाडी मृदुंगमणी संकेत आरोटे, ज्ञानराज पापळ, विशाल वाघमारे, चंद्रकांत चौधरी, किशोर धुमाळ, गायकवृंद किरण महाराज शेटे, सागर नवले, इंद्रभान कोल्हाळ, प्रवीण पांडे, मुकुंद बोऱ्हाडे, रामनाथ देशमुख,
रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, योगी केशव बाबा चौधरी, ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथ मुंदडा यांचे हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवामध्ये 27 मे ला मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर, 31 मे व 1 जून २०२६ शेतकरी मेळावा व दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबीर व आदर्श दूध उत्पादक पुरस्कार देण्यात येणार आहे. 7 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिर, 7 ते 9 जून रोजी भजन स्पर्धा, 8 ते 14 जून राजेंद्र महाराज नवले यांची तुलसी रामायण कथा, 10 जून ला श्रीराम न्यास अयोध्या खजिनदार प.पु. स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सत्संग व प्रवरा माता महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
तरी या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन मनोहर महाराज भोर, दिपक महाराज देशमुख, विश्वस्त गुलाबराव शेवाळे, किसन लहामगे, सु. ग. शाळीग्राम, मधुकरराव वाकचौरे सर्व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे

