shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शनीशिंगणापूर मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; भाविक त्रस्त प्रतिनिधी मोहन शेगर सोनई

सोनंई प्रतिनिधी:
नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव येथे श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही प्रवाशांनी वाहने विरुद्ध दिशेने चालवल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली असून हजारो भाविकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

आज शनी अमावस्या तसेच शनि जयंती असल्यामुळे लाखो भाविक श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत. मात्र एवढ्या मोठ्या गर्दीचा अंदाज असूनही प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे.

अवजड वाहनांना आजच्या दिवशी बंदी घालणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे होते, मात्र तसे कुठेही दिसून आले नाही. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तही अपुरा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भाविकांमध्ये प्रशासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त होत असून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

close