shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलासह कुटुंबावर लाकडी दांडक्याने हल्ला; सात जणांविरुद्ध सोनई पोलिसांत गुन्हा

घरासमोर झालेल्या जुन्या वादातून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप....!

सोनई |प्रतिनिधी मोहन शेगर 
नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनई जवळील नवनाथ नगर भागात जुन्या कारणावरून एका अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा १५ वर्षे ४ महिन्यांचा अल्पवयीन मुलगा असून तो सोनई येथील नवनाथ नगर परिसरातील रहिवासी आहे. दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरासमोर ही घटना घडली.
याप्रकरणी किशोर बापू चांदणे, गारुती बापू चांदणे, ओम भारती चांदणे, सार्थक किशोर चांदणे, साहिल किशोर चांदणे, गुणा बापू चांदणे व सिमा किशोर चांदणे (रा. नवनाथ नगर, सोनई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या घरासमोर व आरोपींच्या घराजवळ कपडे वाळत घालण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांत वाद सुरू झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर वाद अधिकच चिघळला आणि आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेत फिर्यादीच्या आईसह इतर कुटुंबीय जखमी झाल्याचे समोर आले आहे.

घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींकडून पुन्हा मारहाण व धमक्या देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. "पुन्हा समोर आलात तर जिवंत सोडणार नाही," अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई बी एम लबडे हे करीत आहेत . परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून किरकोळ वादातून निर्माण झालेल्या तणावामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे..
close