shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.


मुंबई  -  रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे शहर जिल्हा युवक कमिटीचे सरचिटणीस अशोक कांबळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करुन त्यांचा झालेल्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. दिवंगत अशोक कांबळे यांच्या मारेक-यांना त्वरीत अटक करुन कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी  केली.  

 ना. रामदास आठवले हे दिवंगत रिपब्लिकन कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या कुटुंबियांची  लवकरच सांत्वनपर भेट घेणार आहेत.  रिपब्लिकन वतीने दिवंगत अशोक कांबळे यांना जाहीर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

 दिवंगत अशोक कांबळे रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर जिल्हयातील युवा कार्यकर्ते होते. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन ते करीत होते. राम नगर ठाणे येथे त्यांच्या कामाचे कार्य होते. रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणून त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्यावर अचानक भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांच्या झालेल्या हत्येचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध करीत आहोत. तरी प्रशासनाने सर्व मारेक-यांना त्वरीत अटक करुन गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
close