कळस ( प्रतिनिधी ) अगस्ती एजुकेशन सोसायटी मुंबई चे कळसेश्वर विद्यालय, कळस चे इ. 8 वी तील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 5 उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये विद्यालयातील आर्या गोपीनाथ ढगे १६८ , सृष्टी धनराज वाकचौरे १६६, सार्थक दत्तात्रय ढगे १३६, श्रुतिक संजय वाकचौरे १३४, नैतिक ज्ञानेश्वर बोऱ्हाडे १३२ गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक भाऊसाहेब घेलवडे, माजी मुख्याध्यापिका नंदा बिबवे, शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, मनीषा शिंदे, प्रतीक्षा घुले, कुमार पालवे आदींचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, जिप चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे यांनी अभिनंदन केले.