कळस ( प्रतिनिधी ) :ए अकोले तालुक्यातील कळस गावची कन्या कुमारी किरण कैलास वाकचौरे हिची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डिजीपी कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर निवड झाली आहे.
कळस येथील प्राथमिक शिक्षक कैलास वाकचौरे यांची कन्या असून तिचे शिक्षण काळातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कळशेश्वर विद्यालय कळस बुद्रुक येथे झालेल्या असून तिच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व जिल्हा परिषद चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कळस बुद्रुक ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अकोले पोलीस स्टेशनची पीएसआय खांडबाले यांच्या हस्ते व संगमनेर साखर कारखान्याची संचालक अरुण वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, जय किसान दुसऱ्यांचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, ह भ प गणेश महाराज वाकचौरे, ह भ प अरुण महाराज शिर्के, संगमनेरचे माजी संचालक संभाजी वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, रावसाहेब वाकचौरे, अर्जुन भुसारी, जिजाबा वाकचौरे आदी नी अभिनंदन केले आहे.