shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कदम कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के*

कदम कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के*


*इंदापूर: रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या दहा वर्षापासून विज्ञान विभागाची अकरावी व बारावी या वर्गाची  एक एक तुकडी असून सलग दहा वर्षे 100% निकाल लावून कॉलेजने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यावर्षी विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षा दिली. या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कु पानेरी प्रकाश वाघमोडे या विद्यार्थिनीने 73.17% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकाच्या कू.गौरी राघू नलवडे हिने 64.83% गुण मिळविले. तर 60.83% गुण मिळवून विराज उत्तम गायकवाड याने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे पर्यवेक्षिका सौ. पुष्पा काळे, शाळा समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता-पालक संघ, सर्व पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.विजय धेंडे, प्रा.प्रेम कडवळे, प्रा.रुचिता घाडगे,प्रा.प्रतीक्षा राऊत, प्रा.भाग्यश्री कावळे, प्रा. शितल राखुंडे यांनी मार्गदर्शन केले.

close