*इंदापूरच्या आश्रमशाळेत निकालात मुलींची बाजी*
*इंदापूर( दि.५*) : - येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेच्या मुला- मुलींचा बारावीचा निकाल ९६ % टक्के लागला असून दोन्ही शाखेंनी कॉलेजच्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे.
*विज्ञान शाखेचे पहिले तीन मानकरी*
- *शेकडा गुणांसह -*
*1) कु.गायकवाड पायल चंद्रकांत -67.33%*.
* *2) कु.चव्हाण क्रांती कैलास -63.50 %* *
* *3) कु. काळेल स्नेहल निवास -62.67%*
*कला शाखेचे पहिले तीन मानकरी*
*शेकडा गुणांसह -*
* *1) कु. गुटाळ प्रियंका कानिफनाथ 63%*
* *2) घोडके रोहित शहाजी 56.67 %*
*3) कु. कोथमिरे आरती गणेश -52.17%*
वरील मानकऱ्यांसह उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे व प्राचार्या अनिता साळवे यांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.