येणाऱ्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना
संधी देणार : आमदार हेमंत ओगले
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर मतदारसंघ धर्मनिरपेक्ष असून नेहमीच काँग्रेस विचारसरणीचा राहिलेला आहे. स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांची कार्यशैलीमुळे नगरपरिषद असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसची मजबूत पकड होती. आता देखील आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांच्या पाठीशी आपण ताकद उभी करत स्वर्गीय जयंत ससाणे यांचे स्वप्न साकार करून येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता येईल यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याचे प्रतिपादन काँग्रेसचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केले.
श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीचे आयोजन येथील मेन रोडवरील आगाशे सभागृह याठिकाणी करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार हेमंत ओगले, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, युवानेते करण ससाणे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ नेते भास्कर लिफ्टे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब पा. डावखर,माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरभाई शेख, नगरसेवक दिलीप नागरे, रितेश पा. रोटे, के. सी. शेळके, कलीम कुरेशी आदि उपस्थित होते.
यावेळी आ.हेमंत ओगले म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील स्व. ससाणे साहेबांनी जी काँग्रेसची बांधणी केली त्यामुळे माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला आमदार होण्याची संधी मिळाली, येणाऱ्या निवडणूकीत देखील नव्या जुन्यांचा मेळ घालत श्रीरामपूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील काँग्रेसचेच वर्चस्व राहील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले की, श्रीरामपूर विधानसभेवर काँग्रेसचे आमदार निवडून आल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेस पक्षाची जबाबदारी वाढली असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन पुढे होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांना सामोरे जावे लागेल यासाठी जिल्हा काँग्रेस आपल्या सोबत असल्याचे म्हटले.
यावेळी करण ससाणे म्हणाले की, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्यामुळेच आम्ही या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू शकलो यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही पदाधिकाऱ्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यां आणि आम जनतेने निभावली प्रत्येकाने ही निवडणूक आपली आहे असे समजून काम केले आणि त्याचे मोठ्या विजयात रूपांतर झाले, येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर नगर परिषद असो अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहील यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे म्हटले.
प्रास्ताविक करताना सचिन गुजर यांनी सविस्तर लेखाजोखा मांडत केंद्र शासनापासून तर गाव पातळीवर कसे सुडाचे राजकारण चालू आहे आणि त्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे हे सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीरामपुरात काँग्रेसच नंबर एकचा पक्ष राहिल असा विश्वास व्यक्त केला. भारत भवार यांनी देखील काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे मांडली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, राजू चक्रनारायण विलास दाभाडे,भारत भवार, पंडितमामा बोंबले, ॲड. प्रमोद वलटे,भरत कुंकुलोळ, कांतीशेठ पटेल, दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, सुनील शिरसाठ, भारत तुपे, वैभव गिरमे, नानासाहेब कदम, साईनाथ वेताळ, मुरली राऊत, मीनानाथ खडके, प्रवीण नवले, कॉंग्रेस सेवा दल चे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवर अली सय्यद, जावेद शेख, डॉ. राजेंद्र लोंढे, मिथुन शेळके,आय्याज तांबोळी, रियाजखान पठाण, बाळासाहेब लघे, रज्जाक पठाण, सनी मंडलिक, बाळासाहेब खर्डे, विजय कुऱ्हे, अनिल लबडे, गोकुळ बनसोडे, रितेश एडके , सुनील साबळे, डॉ.वैभव पंडित, सरबजीत सिंग चुग,रितेश चव्हाणके, बाबा वायदंडे, कुणाल पाटील, शाहरुख शेख,रफीक शेख, अशोक जगधने, असलम शेख, परेश गाडेकर,अतिश देसरडा, वैभव कुऱ्हे, रितेश गिरमे, विशाल साळवे, तीर्थराज नवले,राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, राकेश शहाणे,सागर दुपाटी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111