प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी :-
आज केज तालुक्यातील टाकळी येथे रानोबा यात्रेनिमित्त ग्रामस्तांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार हे होते. या वेळी टाकळी गावचे सरपंच आनंतकुमार घुले,चेअरमन श्री रघुनाथ बारगजे,युवा नेते सुरज घुले,उपसरपंच सुरेश घुले,विष्णू राख व ग्रामस्थ तसेच बैलगाडा शर्यतीस मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र येथून आलेले शेतकरी व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली. केज तालुक्यात बऱ्याच दिवसांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमुळे शेतकरी बांधवात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आजूबाजूच्या गावातील शेतकरी बांधवांनी युवकांनी या स्पर्धेसाठी प्रचंड प्रमाणात उपस्थिती लावली होती.