अमळनेर प्रतिनिधी : पंकज पाटील
लोंढवे (ता. अमळनेर) येथील जागृती बाळासाहेब पाटील यांची मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे लोंढवे गावात आनंदाचे वातावरण आहे.
जागृती पाटील या भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच आबासों एस. एस. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबाचा सन्मान वाढला आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच दीपक पाटील यांचे वडील व मार्गदर्शक जगन्नाथ राजमल पाटील यांनी देखील बाळासाहेब पाटील व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
जागृती पाटील यांचे हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.