shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी विद्यार्थ्यांनी पूर्ण केले स्टेजचे बांधकाम*

*माजी विद्यार्थ्यांनी पूर्ण केले स्टेजचे बांधकाम*
इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर येथील माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी प्रशस्त स्टेज बांधून दिले. इंदापूर शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेचे रोपटे 1967 स*** लावले गेले. विद्यालया ची इमारत दो मजली असून 30 वर्ग खोल्या आहेत प्रशस्त असे खेळासाठी मैदान आहे. परंतु स्टेजचे काम अपूर्ण होते. विद्यालयाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने काम पूर्ण करून दिले. यामध्ये एसएससी प्रथम बॅच 1974- 75, माझे विद्यार्थी सुनील जाधव, माजी विद्यार्थी लक्ष्मण हरणावळ, बांधकाम व्यवसायिक विष्णू पवार, आर्किटेक्चर वसंतराव माळुंजकर यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाच्या वतीने या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शाळा समितीचे सदस्य विठ्ठल ननवरे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची जाणीव ठेवून अशाच प्रकारे आपणही विद्यालयाला सहकार्य करावे असे आवाहन केले. माजी विद्यार्थी सेवानिवृत्त अभियंता बाळकृष्ण शिरसागर यांनी आपण गरीब परिस्थितीत कमवा व शिका या माध्यमातून शिक्षण घेऊन सुद्धा विविध पदावर काम करून कर्मवीर अण्णांचा विचार व आदर्श जपण्याचा प्रयत्न केला.तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रयत्न करा मेहनत करा असे आव्हान केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, माता पालक संघाच्या रेश्मा शेख, पालक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले.
close