प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी 28 भारतीय पर्यटकांच्या केलेल्या हत्येचा केजच्या नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला असून गरज पडल्यास भारत सरकारने पाकिस्तान वर कठोर सैनिक कार्यवाही करावी अशी मागणीही केजच्या नागरिकांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी अंधाधुन गोळीबार करून 28 पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश व विश्व हादरून गेले. विशेष म्हणजे हे अतिरेकी सुरक्षितपणे पसारही झाले.
पसार झालेल्या अतिरेक्यांना शोधून फाशीवर लटकवा व हा दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत असल्याने गरज पडल्यास पाकिस्तानला युध्दाद्वारे धडा शिकवा अशी मागणीही नागरिकांनी केली. वरील मागणीचे निवेदन केज तहसीदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, मेजर अजिमोद्दीन शेख, ऍड निखिल बचुटे, सोमनाथ नागरगोजे, महेश जाजू, विकास अप्पा मिरगणे, गोविंद जाजू, शेषराव घोरपडे,शेख चांदपाशा शेख गुलाब, सतीश बनसोडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.