पाण्यासाठी वणवण भटकत पाणी मिळवणे किंवा विकत पाणी घेणे येवढेच पर्याय सद्या या भागातील रहिवासी लोकांच्या नशिबी आले होते. परंतु केज नगरपंचायतीच्या वतीने आज पासून शिक्षक कॉलनी भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे या भागातील रहिवासी गटनेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सिताताई बनसोड , नगरसेवक बाळासाहेब गाडवे, बालाजी जाधव व नगरपंचायत विभागाचे आभार मानत आहे.
शिक्षक कॉलनी भागातील पञकार प्रकाश मुंडे यांचे चिरंजीव राहुल मुंडे यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले होते .राहुल मुंडे यांच्या स्मरणार्थ या भागात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या राहुल मुंडे प्रतिष्ठान, युवा नेते खय्युम शेख , पञकार प्रकाश मुंडे, पिटू भैय्या तांदळे, एम डी घुले सर, अरुण बप्पा धस सर ,सुधाकर ढाकणे सर, अमोल धस, सोनू धस, रतन वाघमारे व नागरिक तसेच महिला मंडळ यांनी पाण्याची टाकी व पाइपलाइनने पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा ही मागणी लावून धरली होती ही मागणी मान्य केल्यामुळे गटनेते हारुण भाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.