शेवगाव [ प्रतिनिधी ] :- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणी इयत्ता दहावी १९९५ ची बॅच या माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिनांक १८ रोजी श्री भगवान विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष परदेशी मेजर यांनी केले तर त्यांना अनुमोदन श्री बाळासाहेब देवडे शंकर भाकरे जालिंदर जाधव गोधाजी शिंदे संतोष शिंदे बाळासाहेब चोरमल पांडुरंग शिंदे यांनी केले यावेळी निवृत्त शिक्षक यांनी उपस्थित माजी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करत शुभ आशीर्वाद व्यक्त केले तसेच शालेय जीवनातील शिक्षण पद्धती आणि सध्याची शैक्षणिक पद्धती यामध्ये अमुलाग्र बदल झाला असून सध्या कॉम्प्युटर मोबाईलच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणे सोयीचे झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील शिक्षणामध्ये परिवर्तन करून मजल मारली आहे असे निवृत्त शिक्षक श्री मुळे सर यांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन श्री अंकुश शिंदे विलास वाघुंबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद डेरे संदीप जाधव यांनी केले
यावेळी उपस्थित मान्यवरांचा आयोजन समिती यांच्या वतीने सन्मान करण्यात आला प्रसंगी निवृत्त शिक्षक श्री मुळे सर माजी मुख्याध्यापक सौ मुळे मॅडम श्री राठोड सर श्री जगताप सर श्री धुलवडे सर श्री आंधळे सर श्री मापारे सर श्री निकाळजे सर श्री शिंदे सर क्लर्क अधिक शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विनोद ढेरे विश्वास वाघुंबरे शंकर भाकरे अंकुश शिंदे मेजर संतोष परदेशी बाळासाहेब देवडे रामदास सोनवणे किरण गोंधळी रुपेश संकलेच्या रामेश्वर विखे नानासाहेब गरड ज्ञानेश्वर घाडगे अशोक भिसे जालिंदर जाधव संतोष शिंदे शरद काकडे हरिश्चंद्र गरड चंद्रकांत भवर संजय भवर राजू शेख संतोष खोसे आबासाहेब गलवर राजाभाऊ देशमुख संदीपराव जाधव माजी सरपंच संदीप शिंदे .गोधाजी शिन्दे राहुल भोंगले शरद काकडे बाळासाहेब चोरमल दत्ता बागडे पांडुरंग शिंदे छाया शिंदे अर्चना खिंवसरा सुरेखा लोंढे बेला जोशी मंगल वैद्य शितल देशमुख शोभा शिंदे वैशाली वाबळे जयश्री मसुरे अनिता हरगणे चंद्रकला लेंडांक सविता हातोटे रत्नमाला राजपुरे शारदा फटांगडे वैशाली गायकवाड सुवर्णा देशमुख आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे सरपंच संदीप जाधव यांनी आभार व्यक्त करत वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्याचे कार्य यावेळी संपन्न झाले स्नेहभोजनानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.