इंदापूर: जिल्हा परिषद शाळा गौराईमळा या शाळेने खाजगी इंग्लिश मीडियम शाळेपेक्षा प्रवेशात आघाडी घेऊन एप्रिल महिन्याच्या शेवटी शैक्षणिक वर्ष २०२५ :२०२६ मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा घेऊन विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का दिला. या वेळी जिल्हा परिषद शाळेत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांचे पालक यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या दारात औक्षण करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
यावेळी शाळेत नव्याने ९ विद्यार्थी दाखल झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी दिली. या वेळी शाळेत शिक्षण घेत असलेल्या जुने विद्यार्थी व पालक यांनी नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्याना खाऊवाटप करून व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शाळेत प्रवेशाला झालेले स्वागत पाहून पालक व विद्यार्थी भारावून गेले. या वेळी शाळे समोर आकर्षक रांगोळी, फुगे व सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. जिल्हा परिषद गौराईमळा शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी परिसरात जाऊन पालकांच्या गाठीभेटी घेऊन या शाळेत प्रवेश घेणेबाबत माहिती दिली होती. शिवाय परिसरात बॅनर, सोशल मीडिया याचा प्रभावी वापर करून दर्जेदार शिक्षणाची हमी देऊन येथे प्रवेश करण्या बाबत विनंती केली होती. परिणाम स्वरूप अगदी खाजगी इंग्लिश मीडियम शाळेतून प्रवेश काढून पालकांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला. या वेळी डॉ.संदिप गार्डी डाॅ. वैशाली गार्डी मॅडम यांच्या उपस्थितीत चौथीतील मुलांचा निरोप समारंभ संपन्न झाला. मुलांनी शाळेला दोन फोटो,दोन भिंतीवरील घड्याळ आणि शिक्षकांना वैयक्तिक पेन आणि गुलाबपुष्प देऊन ऋण व्यक्त केले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा गौराईमळा शाळेच्या माजी विद्यार्थीनी ऋतुजा दासा शिंगाडे हिची कृषी क्षेत्र विकासअधिकारी म्हणुन नियुक्ती झाले बाबतीत तसेच अंबादास शिंगाडे यांची सुकन्या मैथिली हिची पुणे येथील महिलाआणि बालविकास आयुक्तालयात महसूल सहाय्यकया पदावर नियुक्ती झाली म्हणुन शाळा व पालक यांच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात स्पर्धा परीक्षेत फक्त जिल्हा परिषद शाळेतील मुलांचाच दरारा असतो तीच मुले टिकतात .
या वेळी कर्मयोगीचे संचालक अंबादास शिंगाडे , तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण जाधव सर नलवडेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक व गौराईमळा शाळेचे मा़जी शिक्षक विजय ठोंबरे सर यांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोलजी नाझरकर , उपाध्यक्ष अमोल जाधव , माजी अध्यक्ष शहाजी शिंगाडे, दासा शिंगाडे , सदस्य विनोद जाधव , डाॅक्टर शिंगाडे ,पद्मराज जाधव, दासा शिंगाडे ,अनुराधा शिंगाडे ,सारिका शिंगाडे ,मनिषा जाधव ,प्रियांका जाधव ,पूनम जाधव ,कल्पना जाधव, शांता जाधव माजी विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेळगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.उमेश सुपुते सर यांनी केले .प्रास्ताविक गौराईमळा शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रताप शिरसट सर यांनी केले . शेवटी सर्वाना स्नेहभोजनाची सोय करुन उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली .पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.