नवनागापूरात उभारणार भव्य सैनिक स्मारक,वीर सैनिकांच्या शौर्याला सलाम
अहिल्यानगर / प्रतिनिधी :
वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नवनागापूर ग्रामपंचायतीने संस्थेला सैनिक स्मारक उभारणीसाठी भूखंड मंजूर केला आहे. आज या भूखंडाची मोजणी नव नागापूरचे सरपंच डॉ. बबनराव दशरथ डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य सागर वसंतराव सप्रे, ग्रामसेवक ज्ञानदेव शिवाजी अडसुळे, इंजिनीयर किशोर पंढरीनाथ सप्रे, ग्रामपंचायत क्लर्क सचिन भगवान श्रीराम, पाणीपुरवठा क्लर्क प्रकाश बाप्पू गव्हाणे, पाणीपुरवठा कर्मचारी मुबारक सय्यद आणि वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक बाबासाहेब बापूराव तेलोरे, उपाध्यक्ष लहू बन्सी सुलाखे, सचिव रावसाहेब किसन गोरे, संस्थेचे सल्लागार किसन सदाशिव कांबळे, संस्थेचे सर्व माजी सैनिक अनिल गुजर, संदीप हरिचंद्र शंकर भापकर, सुनील खाकाळ, बाबासाहेब रुपनर, पांडुरंग रोकडे, बाजीराव भालेराव यांच्या उत्साही उपस्थितीत पार पडली.
अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असल्याने संस्थेच्या सदस्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, याप्रसंगी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाची एक वेगळीच अनोखी चमक दिसत होती. हे सैनिक स्मारक केवळ माजी सैनिकांसाठी प्रेरणास्रोतच नव्हे तर स्थानिक लोकवस्तीलाही आपल्या शूर जवानांच्या बलिदानाची आठवण करून देईल आणि देशभक्तीची भावना जागृत ठेवेल, असा विश्वास संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायतीने दाखवलेल्या या सहकार्यामुळे आता लवकरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे. वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे आणि नवनागापूरच्या इतिहासात एक सोनेरी पान म्हणून नोंदले जाईल.
या भूखंड मोजणीच्या वेळी वीर सैनिक बहुउद्देशी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सल्लागार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंचांनी देखील या स्मारकाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मान्यवरांची मनोगते
अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले याचा आनंद आहे. हे स्मारक केवळ एक इमारत नसेल, तर ते आपल्या शूरवीरांच्या त्याग आणि शौर्याचे प्रतीक असेल.
अध्यक्ष तथा माजी सैनिक बाबासाहेब बापूराव तेलोरे
ग्रामपंचायतीने दाखवलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल आणि देशसेवा करण्याची भावना त्यांच्या मनात रुजेल. उपाध्यक्ष - लहू बन्सी सुलाखे
----------------------------------------------------
संस्थेच्या सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळे हे स्वप्न साकार होत आहे. लवकरच स्मारकाचे काम सुरू करून ते पूर्णत्वास नेऊ.*सचिव - रावसाहेब किसन गोरे
----------------------------------------------------
हे स्मारक नवनागापूरच्या इतिहासात एक महत्त्वाचा landmark ठरेल. यामुळे गावाची ओळख आणखी वाढेल.- सल्लागार , किसन सदाशिव कांबळे
----------------------------------------------------
ग्रामपंचायत नेहमीच माजी सैनिकांच्या पाठीशी उभी आहे आणि राहील. या स्मारकाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य आम्ही देऊ. हे स्मारक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असेल.
डॉ. बबनराव दशरथ डोंगरे- सरपंच - नवनागापूर ग्रामपंचायत
----------------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111