shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चापडगाव विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


(भाग्यश्री पांडुरंग गोरे ७९.६३ गुणांसह द्वितीय)

शेवगांव प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत शेवगांव तालुक्यातील एफ. डी. एल.शिक्षण संस्थेचे चापडगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९६.३८% तर कला शाखेचा निकाल ४७.५४ % इतका लागला आहे. बारावी विज्ञान शाखेचे एकूण ८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते तर कला शाखेचे एकूण १२० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी कु. कोमल प्रजापती हिने  ७१.३३ गुणासह प्रथम, प्राप्ती खताळ हिने ६८.८३ गुणासह द्वितीय तर सार्थक लांडगे याने ६८.६७ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. 

तर कला शाखेमध्ये वैष्णवी गुंजाळ हीने ८५.८३ गुणासह प्रथम,भाग्यश्री गोरे ७९.६३  गुणासह द्वितीय तर भक्ती काळे हीने ७१,५० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. कु. वैष्णवी गुंजाळ हीने अर्थशास्त्र या विषयात ९७ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.चापडगांव कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली. 
        या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना अध्यापन करणारे प्राध्यापकांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.विद्याधर काकडे , माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. लक्ष्मणराव बिटाळ ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंहभैय्या काकडे , माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख श्रीमती वंदना पुजारी , सहप्रमुख अशोक आहेर , प्राचार्य अरुण वावरे, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे सर्व प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वृंद , ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग गोरे - शेवगाव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close