shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुनील फंड यांची महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महासचिव पदी निवड -


   श्रीरामपुर [ प्रतिनीधी ] सुनिल फंड यांची महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या महासचिव पदि नुकतीच निवड करण्यात आली फंड यांच्या सामाजिक आध्यात्मिक कार्याची  दखल घेऊन  प्रदेशाध्यक्ष खंडेरावजी कडलग तसेच वरिष्ठ पदाधिकारी यांनी सर्वानुमते जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले श्री सुनील फंड यांनी कोपरगाव परिट धोबी सेवा मंडळाचे शहराध्यक्षपद दहा वर्ष भुषविले.त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी सात वर्ष  
विविध उपक्रम राबविले.समाजहितासाठी समाज उपयोगी कामे खुप केली.त्यांच्या प्रयत्नाने कोपरगाव शहरात २००४पासुन पाच गुंठे क्षेत्रावर गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात प्रगती पथावर आहे.

विशेषतः कोपरगाव तालुका परिट धोबी सेवा मंडळाचे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन अहिल्यानगर‌ जिल्हात‌  सर्वात मोठं राष्ट्रसंत गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे.त्याठिकाणी‌ गोरगरिबांना अल्पदरात साखरपुडा,लग्न प्रसंगी देण्यात येते.पाच वेळा विविध सामाजिक संस्थांकडून समाजभूषण पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले .

राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुनील फंड यांनी  अहिल्यानगर जिल्हा कोपरगाव तालुक्यात स्वतःचं अस्तित्व तयार करून  साईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळाचे वतीने गेल्या तीन वर्षांपासून१४८०मुलींना मर्दानी खेळ लाठी काठी तलवार बाजी, दांडपट्टा खेळाची सुरुवात केली.आजही अविरतपणे चालू आहे.

करोना काळात दोन महिने साईगाव पालखी सोहळाचे वतीने २५००जणांनां रोज २वेळा घरपोहच जेवणाची डबे पोहोचवले.
 या नावाने ओळख निर्माण केली आहे.कोपरगाव तालुक्यात समाजाच्या महिलांना आदर्श माता पुरस्कार, युवक उद्योजक, समाजभूषण पुरस्कार आदी पुरस्काराने गौरविण्याचा संकल्प आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फंड यांना शुभेच्छा दिल्या आहेत
close